Languages

   Download App

 युनियन बँक ऑफ इंडियाकडून साई संस्थानच्या रुग्णालयांना ₹१.९३ कोटींची अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा देणगी

युनियन बँक ऑफ इंडियाकडून साई संस्थानच्या रुग्णालयांना ₹१.९३ कोटींची

श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवा उपक्रमांसाठी साईभक्त, उद्योग समूह, बँका व सामाजिक संस्था नेहमीच विविध साहित्य देणगी स्वरूपात देत असतात.
अशाच प्रकारे आज युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या CSR निधीतून श्री साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांसाठी एकूण ₹१ कोटी ९३ लाख किमतीची २ नग अत्याधुनिक 3D नेफ्रोस्कोपी व 2D कॅमेरा यंत्रे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.
ही यंत्रसामग्री संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांच्या आजारांचे अचूक व वेगवान निदान करण्यास मोठी मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पांडे यांचा सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारच्या देणग्यांमुळे संस्थानच्या विविध सेवा कार्यांना अधिक गती मिळून, भाविक व रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Undefined
युनियन बँक ऑफ इंडियाकडून साई संस्थानच्या रुग्णालयांना ₹१.९३ कोटींची अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा देणगी
Sunday, January 25, 2026 - 19:00