Languages

   Download App

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट २०२५ सत्राकरीता प्रवेश सुरू

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट २०२५ सत्राकरीता प्रवेश सुरू

 

शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डा संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी या संस्थेमध्ये ऑगस्ट - २०२५ सत्राकरीता प्रवेश देणे सुरू आहे. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या ११ व्यवसायांच्या २१ व्यवसाय तुकडयामध्ये प्रशिक्षण दिले जाते. ऑगष्ट २०२५ सत्राकरीता प्रवेश क्षमता २८० इतकी आहे. सन १९८४ साली संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेमधील सर्व व्यवसायांना डीजीटी, नवी दिल्ली यांचे कायमस्वरूपी संलग्नता आहे. सर्व व्यवसायांमध्ये अत्याधुनिक मशिनरीवर अभ्यास क्रमानुसार १००% प्रशिक्षण दिले जाते. याकामी असणारे सर्व प्रशिक्षक हे अनुभवी व उच्च विद्याविभूषित आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ही संस्थेतील १००% प्रवेश क्षमतेच्या जागांवार महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने Online गुणवत्तेनूसार भरल्या जातात याकामी शासनाच्या नियमानुसार अत्यंत माफक प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

सन २०२५ मध्ये या संस्थेत इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक मोटर व्हेईकल, टूल अॅण्ड डायमेकर, मशिनिस्ट ग्राईंडर, टर्नर, फिटर, रेफ्रीजरेशन अॅण्ड एसी मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेन्टेंनन्स, वेल्डर, मेकॅनिक ट्रॅक्टर, कॉम्म्पयुटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट या ११ व्यवसायासाठी प्रवेश चालू आहेत.

या संस्थेची उत्कृष्ठ निकालाची परंपरा असुन संस्थेमधील सात प्रशिक्षणार्थी आजपर्यंत देशात प्रथम आलेले आहेत व २६ प्रशिक्षणार्थी राज्यात प्रथम आलेले आहेत. संस्थेला केंद्र शासनाच्या सात वेळा वेगवेगळया ट्रेडमध्ये सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळालेले आहेत. प्रशिक्षण पुर्ण होण्याच्या अगोदरच संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची वेगवेगळ्या नामांकित कंपन्यामध्ये Campus Interview चे आयोजन करून शिकाऊ ऊमेदवारी / नोकरीसाठी निवड केली जाते. यावर्षी सर्व व्यवसायातील १०५ प्रशिक्षणार्थींची Tata motors या कंपनीत व २२ प्रशिक्षणार्थी महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा या कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेली आहे तसेच काही प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा यादीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या वेगवेगळया शिष्यवृत्ती याजेनांचा लाभ संस्थेतील प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांना मिळण्यासाठी संस्थेकडुन मार्गदर्शन केले जाते. यांचा लाभ संस्थेतील बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांना होतो. सन २०२२- २०२३ मध्ये जर्मन व जपान देशात डयुएल डिग्री अभ्यासक्रम व नोकरीकरीता या संस्थेच्या १३ प्रशिक्षणार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यापैकी २ प्रशिक्षणार्थी यांना नियुक्तीपत्र प्राप्त होऊन ते जर्मनी येथे नोकरीसाठी हजर झालेले आहे. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे बरेचसे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील असल्यामुळे संस्थानने विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग संस्थेत सुरु केलेला आहे व याकामी जर्मन भाषा प्रशिक्षकाची नियुक्ती करणेत आलेली आहे.

या सत्राकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. २६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करणेत आलेले आहे. सर्व व्यवसायांसाठी १० वी उत्तीर्ण व Welder या व्यवसायासाठी १० वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से.. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

शिर्डी (फोन नं. ०२४२३ - २५८८५८) यांचेशी संपर्क साधावा.

Undefined
श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट २०२५ सत्राकरीता प्रवेश सुरू
Tuesday, June 10, 2025 - 12:00