Languages

   Download App

साईबाबांच्या चरणी सुवर्णमुकुट आणि चांदीचा हार अर्पण

साईबाबांच्या चरणी सुवर्णमुकुट आणि चांदीचा हार अर्पण

*गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी साईभक्ताने संस्थानला अर्पण केला सोन्याचा मुकुट व चांदीचा हार*
गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस — जो आपल्या आध्यात्मिक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे. या पवित्र दिवशी  श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण आज अनुभवायला मिळाला.
आज गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी, एका अज्ञात साईभक्ताने सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे ५९ लाख रूपये किंमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत, संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला सदर साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
या दानामध्ये  निस्वार्थी भक्ती, भावनांची श्रीमंती आणि गुरूप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सदर साईभक्ताचे सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी, विनम्रता व गुरूंच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो. अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे देणे, प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल.

Undefined
साईबाबांच्या चरणी सुवर्णमुकुट आणि चांदीचा हार अर्पण
Thursday, July 10, 2025 - 14:15