Languages

   Download App

News

News

शिर्डी :- 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक ०९ जुलै २०२५ पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. सौ. प्राची व्‍यास, बोरीवली यांच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी ०६.५० वा. संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर सकाळी ७.०० वा. गुरुस्‍थान मंदीर येथे रुद्राभिषेक करण्‍यात आला. सकाळी १०.०० वाजता सुरु झालेल्‍या काल्याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री पारेश्‍वर बाबासाहेब कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत  श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम झाला. दुपारी ०४.०० ते ०६.००  यावेळेत श्री हिमांशु जुनेजा, सहारणपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती व रात्रौ ०७.३० ते ०९.३०  यावेळेत पद्मश्री मदनसिंह चौहान, रायपुर यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर ,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recent News