Languages

   Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात ३ कोटी ९५ लाख १२ हजार ८४४ रुपये देणगी प्राप्‍त झाली

October 12th, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित दि.०७ ऑक्‍टोबर ते दि.१० ऑक्‍टोबर २०१९ याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या १०१ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सुमारे ०२ लाख २५ हजार साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सशुल्‍क व ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण ५७,४३,८००/- रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सवकाळात २,०५,७३५ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व ४३ हजार ४२२ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच १,०२,१६८ लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे २५,५४,२००/- रुपये प्राप्‍त झाले आहे. तर २,१७,२०० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

तसेच श्री पुण्‍यतिथी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे ५८,३७४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात ५,६२७ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकुण ६४,००१ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती.

उत्‍सवकाळात दानपेटीतून १,७३,८५,४१६/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ९१,०३,४७४/-, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे १,०८,७६,४५०/- रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ३७५.९३० ग्रॅम (रुपये १२ लाख ६७ हजार) व चांदी ३११०.३५० ग्रॅम (रुपये ८३ हजार), सुमारे १९ देशांमधुन परदेशी चलनाव्‍दारे ४,७०,९०३/- रुपये देणगी प्राप्‍त झालेली आहे.

तसेच भिक्षा झोळीत गहु, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, गुळ व खाद्य तेल आदींव्‍दारे २,६१,५२९/- रुपये व ६५,०७२/- रुपये रोख रक्‍कम अशी एकुण ३,२६,६०१/- रुपये इतकी देणगी प्राप्‍त झालेली असून अशा सर्व मार्गाने एकुण ३ कोटी ९५ लाख १२ हजार ८४४ रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याचे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

Recent News