शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संदीपकुमार भोसले, कार्यकारी अधिकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला व-हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याची घोषणा केली.
तसेच, श्री साईबाबांविषयी दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील संस्थानच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश प्राप्त झाले असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर GAC कडून संबंधित व्हिडीओ व लेख २४ तासांत हटविण्याचे आदेश जारी झाले असलेबाबत माहिती दिली व मा. उच्च न्यायालयाचे तसेच या कायदेशीर लढाईत संस्थानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील प्रमोद कुमार दुबे व त्यांचे सहकारी यांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्या विद्या मंदिरचे उपाध्यापक वसंत वाणी व क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या वतीने ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ८:१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वऱ्हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याची घोषणा केली.
तसेच, श्री साईबाबांविषयी दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील संस्थानच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश प्राप्त झाले असून, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर GAC कडून संबंधित व्हिडिओ व लेख २४ तासांत हटविण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती दिली आणि माननीय उच्च न्यायालयाचे तसेच या कायदेशीर लढाईत संस्थानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील प्रमोद कुमार दुबे व त्यांचे सहकारी यांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशू लोकेगांवकर व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या विद्या मंदिरचे उपआचार्य वसंत वाणी व क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.
Shirdi – On the occasion of the 80th Independence Day, the National Flag was hoisted by the Chief Executive Officer of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, Goraksh Gadilkar (IAS), at 8.15 AM on the sports ground of the educational complex. Present in large numbers on this occasion were Deputy Chief Executive Officer Bhimraj Darade, Administrative Officers Pragya Mahandule-Sinare and Sandeepkumar Bhosale, Executive Engineer Bhikan Dabhade, Chief Accounts Officer Mangla Varhade, Security Officer Rohidas Mali, Medical Director Dr. Pritam Wadgave, heads of all departments, Sansthan employees, teachers of the educational complex, and students.
On this occasion, CEO Mr. Gadilkar extended Independence Day greetings to all and remembered the sacrifices of the freedom fighters. Reviewing the educational and social contributions of the Sansthan, he announced the implementation of new initiatives to provide quality education, sports training, and necessary facilities to the students.
Additionally, he shared that the Sansthan's legal battle against misleading content regarding Shri Saibaba has achieved major success. Following the directives of the Delhi High Court, GAC has issued orders to remove the concerned videos and articles within 24 hours. He expressed gratitude to the Hon'ble High Court as well as senior advocate Pramod Kumar Dubey and his associates who represented the Sansthan in this legal battle.
Following this, music teacher of the educational complex Sudhanshu Lokegaonkar and the students presented a patriotic song. The event was anchored by Vasant Vani, Vice-Principal of Kanya Vidya Mandir, and sports teacher Rajendra Kohkade.



