Languages

   Download App

News

News

इ.१० वी व इ. १२ वीच्‍या विद्यार्थ्‍यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

June 8th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या शैक्षणिक संकुलातील श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कुलचा इयत्‍ता १० वीचा निकाल ९४ टक्‍के तर श्री साईबाबा कन्‍या विद्यामंदिरचा ९० टक्‍के लागला असून प्रथम तीन क्रमांक पटकावुन यश संपादन केलेल्‍या इ.१० वी व इयत्‍ता १२ वीच्‍या विद्यार्थ्‍यांचा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी प्रशासकीय अधिकारी सर्वश्री दिलीप उगले, अशोक औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, प्रशासन शाखेचे अधिक्षक विश्‍वनाथ बजाज, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदिरचे मुख्‍याध्‍यापक गंगाधर वरघुडे, इंग्लिश मिडीयम स्‍कुलचे मुख्‍याध्‍यापक आसिफ तांबोळी, संस्‍थान कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मार्च २०१९ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या इ.१० वीच्‍या परिक्षेसाठी श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कुलचे १३६ विद्यार्थी बसले होते, त्‍यापैकी १२८ विद्यार्थी उतीर्ण झाले. यामध्‍ये चि.बागुल ओम सुरेश याने ९१.२० टक्‍के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, कु.तुरकणे अपुर्वा कैलास हिने ८७.८० टक्‍के गुण मिळवुन व्दितीय व कु.गायकवाड पुजा भाऊसाहेब हिने ८७.६० टक्‍के गुण मिळवुन तृतिय क्रमांक पटकाविला. श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदिरच्‍या १२२ विद्यार्थीनी बसल्‍या होत्‍या, त्‍यापैकी ११० विद्यार्थीनी उतीर्ण झाल्‍या. यामध्‍ये कु.जोशी साक्षी महेश हिने ९१.२० टक्‍के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, कु.पटाट प्रि‍ती विजय हिने ८९ टक्‍के गुण मिळवुन व्दितीय व कु.गिते ज्ञानेश्‍वरी सुनिल हिने ८८.६० टक्‍के गुण मिळवुन तृतिय क्रमांक पटकावीला. तसेच फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या इ.१२ वीच्‍या परिक्षेसाठी श्री साईबाबा कनिष्‍ठ महाविद्यालयातुन कला शाखेतुन १९१, वाणिज्‍य शाखेतुन २२६ व विज्ञान शाखेतुन १८४ विद्यार्थी बसले होते. यामध्‍ये कला शाखेतुन चि.मंजरे आकाश नानासाहेब याने ८०.३० टक्‍के गुण मिळवुन प्रथक क्रमांक, कु.अन्‍सारी हीना अब्‍दुल हिने ७२.४६ टक्‍के गुण मिळवुन व्दितीय व चि.धिवर प्रफुल्‍ल लुकास याने ६८.६१ टक्‍के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावीला. वाणिज्‍य शाखेतुन कु.चौधरी श्रध्‍दा बाजीराव हिने ८२.९२ टक्‍के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, कु.तुरकणे श्रध्‍दा आप्‍पासाहेब हिने ८२ टक्‍के गुण मिळवुन व्दितीय क्रमांक व कु.साठे विशाखा विलास हिने ८१.३८ टक्‍के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला. तर विज्ञान शाखेतुन चि.देव्‍हारे आकाश भगवान याने ७०.३० टक्‍के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, चि.गिते ऋुषीकेश अशोक याने ६८.४६ टक्‍के गुण मिळवुन व्दितीय क्रमांक व चि.चोळके साईदिप ज्ञानेश्‍वर याने ६७.८४ टक्‍के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावीला.

अशा या गुणवंत्‍त विद्यार्थ्‍यांचा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्‍कार केला. या सर्व विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या यशाबद्दल त्‍यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. तसेच यापुढे ह्या विद्यार्थ्‍यांनी असेच यश प्राप्‍त करुन आपल्‍या शाळेच्‍या नावलौकीकात भर पाडावी अशी आशा ही श्री.मुगळीकर यांनी व्‍यक्‍त केली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विकास शिवगजे यांनी केले.

Recent News