Languages

   Download App

News

News

सुर्यग्रहणामुळे श्री साईबाबा समाधीमंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल

December 19th, 2019

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण असल्‍यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला असून सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८.०५ ते सकाळी ११.०० याकाळात कंकणाकृती सुर्यग्रहण आलेले आहे. त्‍यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्‍ये बदल करण्‍याबाबतचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे. यामध्‍ये सकाळी ८.०० वाजता श्रींचे दर्शन बंद होईल, सकाळी ८.०५ वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्‍चार सुरु होईल, सकाळी ११.०० वाजता मंत्रोपच्‍चार संपल्‍यानंतर श्रींचे मंगलस्‍नान होवुन श्रींची शिरडी माझे पंढरपूर आरती होईल. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल.

तसेच सदर ग्रहण काळात श्री साईसत्‍यव्रत व अभिषेक पुजा बंद ठेवण्‍यात आल्‍यामुळे त्‍याकाळातील ऑनलाईन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांकरीता सकाळी ७.०० ते ८.०० यावेळेत श्री साईसत्‍यव्रत व अभिषेक पुजेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे सांगुन सर्व साईभक्‍तांनी याची नोंद घेवुन सहकार्य करावे असे आवाहन श्री.मुगळीकर यांनी केले.

Recent News