Languages

   Download App

News

News

सुरक्षा साहित्‍य देणगी

July 21st, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेकामी रिलायन्‍स इंडस्‍ट्रीज, मुंबई यांनी ०१ कोटी १७ लाख ०६ हजार ७८० रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, रिलायन्‍स इंडस्‍ट्रीज, मुंबई यांनी संस्‍थानला सुरक्षा व्‍यवस्‍थेकरीता ०१ कोटी १७ लाख ०६ हजार ७८० रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिलेले असून यामध्‍ये एक्‍स रे बॅग स्‍कॅनर ०४ नग, डोअर फ्रेम मेटल डिटेक्‍टर १५ नग, हॅण्‍ड हेल्‍ड मेटल डिटेक्‍टर ४० नग, रिपिटर व्‍हॅप ०१ नग, वॉकी-टॉकी कंट्रोलर ०१ नग, वॉकी-टॉकी (हॅण्‍ड हेल्‍ड ट्रान्‍स रिसिव्‍हर) ७५ नग व वॉकी-टॉकी अतिरिक्‍त बॅट-या ७५ नग आदी सुरक्षा साहित्‍यांचा समावेश आहे. त्‍यापैकी आजतागायत एक्‍स रे बॅग स्‍कॅनर ०४ नग हे संस्‍थानला प्राप्‍त झालेले आहे. उरर्वरित सुरक्षा साहित्‍य लवकरच संस्‍थानला प्राप्‍त होणार आहे.

यापुर्वी हे साहित्‍य संस्‍थान खाजगी सुरक्षा कंपनीकडून भाडेतत्‍वावर वापरत होते. या देणगीमुळे संस्‍थानचे महिन्‍याकाठी भाडेतत्‍वावर खर्च होणारे सुमारे ०५ लाख रुपये बचत होणार असल्‍याचे श्री.मगुळीकर यांनी सांगितले.

Recent News