Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात प्राप्‍त झालेली देणगी

October 20th, 2018

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित दि.१७ ऑक्‍टोबर ते दि.१९ ऑक्‍टोबर २०१८ याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या १०० वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सुमारे ०३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सशुल्‍क व ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण ७८,६१,०००/- रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सवकाळात २,२३,६२४ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व ४५ हजार ५२७ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच १,१४,०६२ लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे २८,५१,५५०/- रुपये प्राप्‍त झाले आहे. तर २,५०,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

तसेच श्री पुण्‍यतिथी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे ५४,७८७ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात ५,९८४ व शिर्डी आणि शिर्डी परिसरात निवासव्‍यवस्‍थेसाठी उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या ७ मंगलकार्यालयांव्‍दारे ४,७७७ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकुण ६५,५४८ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती.

उत्‍सवकाळात दानपेटीतून २,५२,८९,४२६/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे १,४६,५०३३६/-, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे १,४१,३४,५००/- रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ९००.९४० ग्रॅम (रुपये २६,०७,२९४/-) व चांदी ७११४.८०० ग्रॅम (रुपये २,१७,९४५/-), सुमारे २१ देशांमधुन परदेशी चलनाव्‍दारे २४,५५,०००/- रुपये देणगी प्राप्‍त झालेली आहे. भिक्षा झोळीत गहु, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, गुळ व खाद्य तेल आदींव्‍दारे २,६७,४१२/- रुपये व ९२,६६६/- रुपये रोख रक्‍कम अशी एकुण ३,६०,०७८/- रुपये इतकी देणगी प्राप्‍त झालेली आहे. श्री पुण्‍यतिथी उत्‍सव २०१७ मध्‍ये ४.७१ कोटी व २०१८ मध्‍ये ५.९७ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असून यावर्षी १.२६ कोटी रुपये देणगी जास्‍त प्राप्‍त झालेली आहे.

Recent News