Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या सेवा‍निवृत्‍त होणा-या २७ कर्मचा-यांचा सत्‍कार

June 4th, 2019

री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या आस्‍थपनेवरील विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवून सेवा‍निवृत्‍त होणा-या २७ कर्मचा-यांचा सत्‍कार संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने आस्‍थपनेवरील माहे मे-२०१९ मध्‍ये विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवुन सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-यांचा सेवानिवृत्‍त निरोप समारंभ आयोजित करण्‍यात आला होता.या समारंभास संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी तथा मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे , दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, प्रशासन शाखा अधिक्षक विश्‍वनाथ बजाज व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांमध्‍ये भांडार विभागाचे अधिक्षक अशोक झुरंगे, लेखाशाखा विभागाचे वरिष्‍ठ लेखापाल वसंत जेजुरकर यांच्‍यासह विविध विभागांचे एकुण २७ कर्मचा-यांचा समावेश आहे. यासर्व कर्मचा-यांचा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांनी सत्‍कार केला. यावेळी लेखाशाखा विभागाचे वरिष्‍ठ लेखापाल वसंत जेजुरकर यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांची भाषणे झाली.

याप्रसंगी श्री.मुगळीकर यांनी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांनी अनेक वर्ष या ठिकाणी कर्तव्‍याचे पालन करुन उत्‍तम सेवा केली त्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करुन त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विकास शिवगजे यांनी केले.

Recent News