Languages

   Download App

News

News

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

June 4th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या दक्षता पथक सदस्‍य व फायर विभाग कर्मचा-यांना यशदा, पुणे मार्फत दिनांक २९ मे ते ३० मे २०१९ याकालावधीत आयोजित करण्‍यात आलेल्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

याकार्यक्रमास संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, प्र.फायर अधिकारी प्रताप कोते, यशदा संस्‍थाचे कर्मचारी व संस्‍थानचे प्रशिक्षणार्थी कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. तसेच यावेळी यशदा, पुणेच्‍या वतीने प्रशिक्षण देण्‍यासाठी आलेल्‍या कर्मचा-यांचा संस्‍थानच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबा मंदिर परीसरात झिरो कॅज्‍युलटी दर्शन व्‍यवस्‍था होणेकामी फायर विभागांतर्गत दि.१४.०२.२०१९ रोजी पासुन नियमीत २४ तास १२ कंत्राटी पथक नियुक्‍त करण्‍यात आलेले आहे. या नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या दक्षता पथकाच्‍या सदस्‍यांना प्रशिक्षण देणेकामी संस्‍थानच्‍यावतीने पुणे येथील यशदा या संस्‍थेला निमंत्रित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्‍यानुसार दिनांक २९ मे ते ३० मे २०१९ या कालावधीत कंत्राटी दक्षता पथकातील १२ कर्मचारी, फायर विभागातील ३१ कर्मचारी तसेच ठरावीक कालावधीसाठी नियुक्‍त दक्षता पथक (एमर्जन्‍सीचे वेळी/उत्सव कालावधीतील) ३६ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले.

या प्रशिक्षणामध्‍ये यशदा पुणे या संस्‍थेचे श्री.नायडू यांनी दक्षता पथकाच्‍या कर्मचा-यांना कॅरी ऑफ कॅज्‍युअलटी, फस्‍ट एड, टु हॅड, थ्री हॅड लिफ्ट, बॅडेज, सर्प दंश, फिट येणे, हदयविकार, फायर, नॉट, फस्‍ट एड मध्‍ये बॅंडेज कसे बांधायचे याबाबत माहिती देवून कृती करुन घेण्‍यात आली. त्‍यानंतर यशदा पुणे या संस्‍थेचे श्री.सुपनेकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना गर्दीचे वेळी संस्‍थान परिसरात आत्‍पकालीन परिस्थितीत करावयाच्‍या उपाययोजनाबाबत माहिती दिली. तसेच संस्‍थान परिसरात असणा-या संभावित धोके कसे टाळता येईल, याबाबत माहिती दिली. तसेच सर्व कर्मचारी यांना प्रोजेक्‍टरव्‍दारे मांढरा देवी, अय्यप्‍पा स्‍वामी मंदिर तसेच इतर ठिकाणी घडलेल्‍या आपत्‍कालीन घटनांबाबत माहिती दिली व अशा परिस्‍थीतीमध्‍ये काय उपाययोजना केल्‍या पाहिजे, याबाबत माहिती दिली. संस्‍थानचे फायर अॅण्‍ड सेफ्टी विभागामार्फत संस्‍थानचे दक्षता पथक कर्मचारी, फायर विभाग कर्मचारी, संरक्षण विभागाचे कर्मचारी यांना यशदा मार्फत यापुर्वी देण्‍यात आलेल्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षणाचा उपयोग आतापर्यंत गर्दीचे कालावधीत चांगल्‍या प्रकारे झालेला आहे.

तसेच यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दक्षता पथकाच्‍या कर्मचा-यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Recent News