Languages

   Download App

News

News

मोफत प्‍लॅस्‍टीकसर्जरी शिबीराचे आयोजन

September 11th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) व गीव्‍ह मी फाईव्‍ह फाऊंडेशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने श्री साईनाथ रुग्‍णालयात दिनांक ०९ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ याकालावधीत मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वतीने वर्षभर विविध शिबीरांचे आयोजन करण्‍यात येते. यामध्‍ये मोफत नेञ तपासणी व चष्‍मेवाटप शिबीर, मोफत मोतीबिंदू व तिरळेपणा शस्‍ञक्रिया शिबीर, महारक्‍तदान शिबीर तसेच किडनी स्‍टोन शिबीर व मोफत कृत्रिम पायरोपण आणि हातरोपण शिबीर आदी शिबीरांचा समावेश आहे. दिनांक ०९ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ याकालावधीत श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) व गीव्‍ह मी फाईव्‍ह फाऊंडेशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले असून सदर शिबीराकामी औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध प्‍लॅस्‍टीक सर्जन डॉ. राम चिलगर व त्‍यांची टीम श्री साईनाथ रुग्‍णालयात येवुन रुग्‍णांवर प्‍लॅस्‍टीक सर्जरी शस्‍त्रक्रिया मोफत करणार आहेत. सदर शिबीरासाठी रुग्‍णांची निवड करणेकामी डॉ.राम चिलगर, प्‍लॅस्‍टीक सर्जन हे प्रत्‍येक महिन्‍याच्‍या दुस-या शनिवारी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० यावेळेत ओ.पी.डी. नंबर ०३, सर्जरी विभाग, श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत पुर्व तपासणी करीता येणार आहेत. या शिबीरामध्‍ये जळीत रुग्‍णांची चिकटलेले हात, चिकटलेले खांदे, जन्‍मजात चिकटलेली बोटे, चिकटलेली मान, हात व पायाचा हत्‍तीरोग आदी रोगांवर उपचार केले जातील.

या शिबीरात सहभागी होण्‍याकरीता गरजु रुग्‍णांनी आपली नावे श्री साईनाथ रुग्‍णालयात नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी (०२४२३) २५८५५५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्‍णांनी उपचारासाठी येतानी सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवुन यावे असे सांगुन जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांनी या शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.

Recent News