Languages

   Download App

News

News

पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

July 29th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्‍ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत साईनगर मैदानावर आयोजित करण्‍यात आलेल्‍या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पारायण सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. त्‍यानुसार शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्‍ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.०० यावेळेत (महिला वाचक) साईनगर मैदानावर श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या पारायण सोहळ्या निमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून प्रथम दिवशी दिनांक ०२ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी ०५.०० यावेळेत पारायणार्थी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम, रात्रौ ०७.३० ते ०९.०० यावेळेत श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, शिर्डी यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम साईनगर मैदानावर व सायं.०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री.श्रीकांत तटकरे, मुंबई यांचे साईबाबा द युनिव्‍हर्स नाटक कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेाजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०३ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.अनंत पांचाळ, मुंबई यांचा अभंग/भक्‍तीसंगीत कार्यक्रम व सायं.०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.मनहर उधास, मुंबई यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०४ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.नरेंद्र नाशिरकर, नागपूर यांचा संगीतमय साई विचार कथा कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.विजय साखरकर, मुंबई यांचा साई स्‍वर नृत्‍य कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे.

दिनांक ०५ ऑगस्‍ट रोजी रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.शार्दुल महाडीक, मुंबई यांचा महाराष्‍ट्र देश सुंदरा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०६ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.संदीप गव्‍हाणे, शिर्डी यांचा नृत्‍य कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत साई ऋषी, कलकत्‍ता यांचा साई जीवन चरित्र (नाटक) हा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०७ ऑगस्‍ट रोजी सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.हरिष ग्‍वाला, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत राहुल गुप्‍ता (अर्जुन सरगम), दिल्‍ली यांचा राधाकृष्‍ण शिव तांडव नृत्‍य कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०८ ऑगस्‍ट रोजी रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत महेश कुडाळकर, कुडाळ यांचा दशवतारी नाटक कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०९ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.३० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० महिला वाचक वाजता अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. दुपारी ०३.३० ते ०७.३० यावेळेत शिर्डी गावातुन श्री साईसच्‍चरित या ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात येईल. सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.प्रभंजन भगत, लोणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे.

तसेच दिनांक १० ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० योवेळेत ह.भ.प.श्री.महेश जोशी, बीड यांचे काल्‍याचे कीर्तन साईनगर मैदानावर होईल व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० योवेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्‍याचे सांगून या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन श्री.मुगळीकर यांनी केले.

या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वाचकांनी अमोल फार्मास्युटीकल्स नगर-मनमाड रोड इंडीयन ऑयल (गोंदकर पेट्रोल पंप) व वत्सला हॉटेलशेजारी अमोल कोते शिर्डी, श्री रामचंद्र दत्‍तात्रय सारंगधर हेडगेवार नगर शिर्डी, लक्ष्मी आनंद मेडीकल स्टोअर्स श्री साईबाबा हॉस्पिटल समोर, हॉटेल साईराम लॉज एम.टी.डी.सी.च्यामागे शिर्डी, श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड शिर्डी, शिर्डी, ऑल मार्ट होजीयरी कानिफनाथ मंदिरचौक शिर्डी, बाबा प्रिंटर्स बिरेगांव रोड कालीकानगर शिर्डी, श्री.गौरव मधुकर उपासनी नांदुर्खी रोड विठ्ठलवाडी रोड, नविन प्रसादालय कार्यालय शिर्डी, शंकर पार्वती कोल्ड्रींक्स सन अॅण्‍ड सॅन्ड रोड शिर्डी, मयुरी किराणा अॅण्‍ड जनरल बन रोड विरभद्र कॉलनी शिर्डी, हॉटेल साई सेवा साई कॉम्पलेक्सच्या पाठीमागे शिर्डी, सुर्याफुडस्‍ (बेकरी) शिर्डी रेल्वे स्टेशनगेट जवळ नगर-मनमाड रोड शिर्डी, कोमल किराणा नविन पिंपळवाडी रोड वराह चौक शिर्डी, साईराम किराणा साईश्रध्‍दा हौसिंग सोसायटी समोर शिर्डी व श्री.दत्‍तात्रय शिवाजी कोते नगरसेवक कार्यालय विठ्ठलवाडी नांदुर्खी रोड शिर्डी याठिकाणी आपली नावे नोंदवावीत. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच ०२ तास अखंड विणासेवेसाठी इच्छुकांनी आपली नावे नोंदणी कार्यालयात नोंदवावीत.

Recent News