Languages

   Download App

News

News

श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात

August 2nd, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्‍ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यात सुमारे ०४ हजार ५०० महिला व ०२ हजार पुरुष असे सुमारे ०६ हजार ५०० पारायणा‍र्थींनी सहभाग घेतला.

आज सकाळी श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे रथातुन पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी विणा, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांनी पोथी, सौ.नलिनी हावरे यांनी कलश, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी सौ.सरस्‍वती वाकचौरे, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, नाटय रसिक संचाचे आप्‍पासाहेब कोते, भास्‍करराव गोंदकर, भाऊसाहेब साबळे, संस्‍थानचे कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथ व कलश पूजन करुन श्री साईसच्‍चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्‍यात आला. सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत श्री साईसच्‍चरिताचे वाचन करण्‍यात आले. सायंकाळी ०५.०० यावेळेत पारायणार्थी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम झाला. रात्रौ ०७.३० ते ०९.०० यावेळेत श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, शिर्डी यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर व सायं.०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री.श्रीकांत तटकरे, मुंबई यांचे साईबाबा द युनिव्‍हर्स हा नाटकाचा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपाच्‍या स्‍टेजवर संपन्‍न झाला.

हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, नाटय रसिक संचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Recent News