Languages

   Download App

News

News

श्री साईसच्‍चरित पारायण सोहळयानिमित्‍त श्रींच्‍या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाली.

August 9th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ०२ ऑगस्‍ट २०१९ रोजी सुरु झालेल्‍या श्री साईसच्‍चरित पारायण सोहळयानिमित्‍त आज श्रींच्‍या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाली.

दिनांक १० ऑगस्‍ट पर्यंत चालणा-या या पारायण सोहळयामध्‍ये शिर्डी व पंचक्रोशितील सुमारे ७ हजार पारायणार्थी सहभागी झाले होते. आज सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती झाली. त्‍यानंतर संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची पुजा करण्‍यात आली. याप्रसंगी जिल्‍हापरिषद अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, राहाता नगरपरिषदच्‍या नगराध्‍यक्षा सौ.ममता पिपाडा, सौ.कांचन मांढरे, सौ.नंदाताई लोखंडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री आकाश किसवे, सुर्यभान गमे, अशोक औटी, नाट्य रसिक संचाचे पदाधिकारी आदींसह पारायणार्थी व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर नाट्य रसिक मंचाचे अध्‍यक्ष आप्‍पासाहेब कोते, उपाध्‍यक्ष अशोक नागरे, सचिव अशोक कोते, भाऊसाहेब साबळे, भास्‍कराव गोंदकर व पदाधिका-यांचा आणि पारायण वाचक पुरोहीतांचा सत्‍कार करण्‍यात आला.

या प्रसंगी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, जिल्‍हापरिषद अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांची भाषणे झाली. त्‍यानंतर महेश कुडाळकर, कुडाळ यांचा दशवतारी हा नाटकाचा कार्यक्रम झाला.

पारायणार्थींसाठी आज सकाळी स्‍नेहभोजनाचे आयोजन करण्‍यात आले होते. दुपारी ३.३० वाजता श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची ढोल-ताशा व लेझीमच्‍या निनादात आणि जिवंत देखावे सादर करुन शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्‍यात आली. यामध्‍ये संबळ, सनई व डफवादन, शिंग तुतारी सनई चौघडा कोपरगांव, झांजपथक सन्मित्र मंडळ शिर्डी, मोरया ढोलपथक मुंबई, जिवंत देखावे कुडाळ व पुणे व दाक्षिणात्‍य वाद्य आदींचा समावेश होता. या मिरवणूकीत पारायणार्थी व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. सायं.०४.०० वाजता श्री.प्रभंजन भगत, लोणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपाच्‍या स्‍टेजवर संपन्‍न झाला.

पारायण सोहळ्याच्‍या निमित्‍ताने आठ दिवस विविध धार्मिक, सांस्‍कृतिक, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले होते. उद्या दिनांक १० ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० योवेळेत ह.भ.प.श्री.महेश जोशी, बीड यांचे काल्‍याचे कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० योवेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम साईनगर मैदानावर होणार आहे.

Recent News