Languages

   Download App

News

News

अद्यावत अग्निशमन वाहन आज पासून संस्‍थान सेवेत दाखल

June 20th, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सुमारे ७० लाख रुपये खर्च करुन खरेदी करण्‍यात आलेली भारतबेंझ कंपनीची अद्यावत अग्निशमन वाहन आज पासून संस्‍थान सेवेत दाखल झाली असून या अग्निशमन वाहनाची संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते विधिवत पुजा करण्‍यात आली.

यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, फायर अॅण्‍ड सेफ्टी विभागाचे प्रमुख प्रताप कोते, सर्व विभागांचे प्रमुख्‍य व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री.मुगळीकर म्‍हणाले की, श्री साईबाबा संस्‍थानकडे यापुर्वी तीन अग्निशमन वाहने असून त्‍यामध्‍ये ०१ फोम टेंडर, ०१ मिनी टेंडर व ०१ फायर बाईक आहे. आता नव्‍याने भारतबेंझ चेसीवर सुमारे ७० लाख रुपये किमंतीचे वॉटर बाउझर अग्निशमन खरेदी करण्‍यात आलेली आहे. या अग्निशमन वाहनावर ४ कर्मचा-याची नेमणुक करण्‍यात येणार असून त्‍यामध्‍ये ०२ होजरील, ४ होज डिलेव्‍हरी लाईन व ०१ अद्यावत रिमोट ऑपरेटेड मॉनिटर आहे. या अग्निशमनची १० हजार लिटर पाणी, ५०० लिटर फोमची क्षमता आहे. तसेच डीसीपी व सी ओ टु मिनी फोल्‍ड सिस्‍टीम, लिफटींग बॅग ३० व ५० टन, बी.ए.सेट, आस्‍का लाईट, आस्‍का बॅक पॅक, हायड्रोलीक कटर/स्‍प्रेडर, वुड कटर व बोल्‍ट कटर आदी सुविधा ही उपलब्‍ध असल्‍याचे सांगुन अग्निशमन वाहन संपर्कासाठी फायर कंट्रोल ०२४२३-२५८९८१, हेल्‍पलाईन ०२४२३-२५६६७५ (११०), ऑपरेटर – ०२४२३- २५८५०० व फायर ऑफीसर – ७७२००७७२८६ या क्रमांकांवर संपर्क करावे असे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

Recent News