Languages

   Download App

श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचा दहावी-बारावीत उल्लेखनीय निकाल

श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचा दहावी-बारावीत उल्लेखनीय निकाल

*श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलातील शाळांचे दहावी बारावीचे उल्‍लेखनीय निकाल*

 

 

सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परिक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परिक्षांत श्री साई संस्थानच्या विद्यालयांनी घवघवित यश प्राप्त केले आहे. संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) मॅडम आणि जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराव दराडे यांचेकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन करणेत आले आहे.

      राज्य मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल घोषित करणेत आला. श्री साईबाबा कन्या विद्या  मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे २१४ विद्यार्थी प्रविष्ठ होते. पैकी १८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचे १०१ पैकी ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचे  ९६ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरासरी निकाल ७१.५९ टक्के लागला. (विज्ञान शाखेत प्रथम- कु. सुबंध साक्षी संजय ७१.८३%, द्वितीय - कु. वेताळे एैश्‍वर्या राजू  ६९.८३%, तृतीय - कु. वाणी दिशा दत्‍तात्रय ६९.००%, वाणिज्‍य शाखेत प्रथम- कु. कुमावत रुद्राक्ष अनिल ८५.१७%, द्वितीय - कु. सुर्यवंशी समर्थ निलेश  ७७.७७%, तृतीय - कु. ठोके अर्पिता मदन ६८.१७%, व कला शाखेत प्रथम- कु. धिवर स्‍नेहल भानुदास ७३.५०%, द्वितीय - कु. गोसावी शालीनी पुंजाहरी  ६९.५०%, तृतीय - कु. गायकवाड कुणाल विठ्ठल ६७.६७%) 

माध्यमिक विभागात श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या इ. १० वीत १५७ पैकी १४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण होत ९३.६३ टक्के निकाल लागला. ( प्रथम- कु. पानसरे सायली गणेश ९५.८०%, द्वितीय - कु. गायकवाड साईशा शिवाजी ९४.२०%, तृतीय - कु. वाबळे गायत्री गोरखनाथ ९२.००% ) 

श्री साईबाबा इंग्लिश मिडीअम स्कूलचे इयत्‍ता १० वीत २३१ पैकी २२७ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९८.२६ टक्के निकाल लागला. ( प्रथम - कु. स्वराली किरण हंगेकर ९५.६०% द्वितीय - कु. ज्ञानेश्वरी जनार्दन कौसे ९२.६०% तृतीय - कु. अर्पिता श्रीकृष्ण पवार ९१.२०%)  यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री गंगाधर वरघुडे, प्राचार्य श्री आसिफ तांबोळी तसेच शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले. संस्थानचे शै. संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री. विश्‍वनाथ बजाज व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Undefined
श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचा दहावी-बारावीत उल्लेखनीय निकाल
Wednesday, May 14, 2025 - 16:30