Languages

   Download App

‘घरोघरी बाप्पा’ अभियानात सहभागी व्हा; आपल्या गणेशोत्सवाची कहाणी Bappa.org वर नोंदवा

‘घरोघरी बाप्पा’ अभियानात सहभागी व्हा; आपल्या गणेशोत्सवाची कहाणी Bappa.org वर

‘घरोघरी बाप्पा’ अभियानात सहभागी व्हा; आपल्या गणेशोत्सवाची कहाणी Bappa.org वर नोंदवा

महाराष्‍ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी ‘घरोघरी बाप्पा’ (#घरोघरीबाप्पा | #GharoGhariBappa) हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

               या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुटुंबे, गणेशभक्त, गणेश मंडळे तसेच विविध समुदायांना आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या परंपरा, उत्सवातील विशेष क्षण आणि आठवणी Bappa.org या डिजिटल व्यासपीठावर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

              या उपक्रमात सहभागी होणे पूर्णपणे विनामूल्य आहे. नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाची कहाणी नोंदविण्यासाठी www.bappa.org या संकेतस्थळाला भेट देता येईल अथवा +91 91361 72681 या WhatsApp क्रमांकावर संदेश पाठविता येईल. 

             या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या कहाणीचे यशस्वी सादरीकरण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे. सहभागी कुटुंबांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करताना #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

               श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व साईभक्त, नागरिक आणि गणेशभक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा आणि आनंद महाराष्ट्रासोबत शेअर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

सहभागी होण्यासाठी

 वेबसाईट : www.bappa.org

 WhatsApp : +91 91361 72681

 Instagram / Facebook / YouTube : @BappaOrg

 

Marathi
‘घरोघरी बाप्पा’ अभियानात सहभागी व्हा; आपल्या गणेशोत्सवाची कहाणी Bappa.org वर नोंदवा
Saturday, September 19, 2026 - 17:00