Languages

   Download App

History

History

IntroductionThe extracts in this anthology are taken from Shri Sat Charitra. They comprise parts of Chapters in which the author, Shri Govind Raghunath Dabolkar alias Hemadpant refers to Saibaba his devotees and vision.

Shri Sai Baba

Shri Sai Baba is revered as one of the greatest saints ever seen in India, endowed with unprecedented powers, and is worshipped as a God incarnate. (SAI meaning Sakshaat Ishwar) - GOD THE ABSOLUTE

This mysterious Fakir first made his appearance in Shirdi as a youth and remained there throughout his long life. HE transformed the lives of those who met him and continuously is doing so even after his Samadhi in 1918 for those whose hearts are touched by his love and who pray and call him at any emergency in life for his blessings.

Baba stated that his mission is to “Give Blessings” without discrimination to all, and he proves it in myriad ways by healing the sick, saving lives, protecting the vulnerable, averting accidents, granting offspring, facilitating financial gain, bringing people into harmony within themselves and with each other and, above all, in effecting the spiritual evolution and transformation of those who came to him as the last resort.

Baba is, as one of his contemporary devotees put it, “The embodiment of the Supreme Spirit lighting the sadhaka's (seekers') path by His every word and action”.

To his devotees, Baba is nothing less than a GOD. This has been a matter of experience and not imaginary.

“I look on all with an equal eye”

An outstanding aspect of Sai Baba is that he is beyond distinctions of religion, caste or creed. He embodied all religions and preached the Universal religion of Love.

Devotees of all faiths find their meeting point in Sai and people from all communities and all walks of life are united by the great love and reverence Baba inspires in them. Baba had great regard for his hindu devotees and their Gurus and he responded to their needs and permitted worship according to the hindu and other religious rituals. At the same time his dwelling place was a Masjid (Mosque) and the name of Allah was ever on his lips. HE described himself as in Service to GOD (ALLAH) and as a soul ever remembering ALLAH -(YAD - A - HAKKA)

People today flock Shirdi in ever-increasing numbers to pay homage to the Divine and to experience the truth of Baba’s promise that He would be active in answering devotees' prayers even from his tomb. Like Ten Commandments BABA has given eleven assurances to humanity for welfare.

Baba said that he was a slave in the service of those who loved him that he was ever living to help those who turn to him and that he has to take care of his children day and night. He then taught values of total surrender to the Almighty Master (ALLAH MALIK EK- The only ONE) and experience his grace.

In coming to Baba’s Shirdi His children experience the truth how BABA unfailingly fulfils his commitments to his devotees by coming to their rescue in times of crisis.

प्रकट होणे व प्रथम आगमन

Origins सोडोनि माता पितर आप्‍त । गणगोत आणि जात पात ।

त्‍यागूनि सकळ संसार जात । प्रकटला जनहितार्थ शिरडीत । (स.अ. ४, ओवी ११५)

श्री साईबाबांचे आईवडील, जन्‍मस्‍थळ किंवा जन्‍म याविषयी कोणालाही काहीही माहिती नाही. बाबांना व इतरानांही याविषयी अनेक प्रश्‍न विचारले चौकशी केल्‍या परंतू खात्रीलायक उत्‍तरे किंवा माहिती अजूनही उपलब्‍ध नाही.

भक्‍तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्‍या रुपात शिरडीला निंबाखाली प्रकट झाले. त्‍यावेळीसुध्‍दा ते ब्रम्‍हज्ञानाने परिपूर्ण वाटले. त्‍यांना स्‍वप्‍नातसुध्‍दा ऐहिक सुखाची किंवा वस्‍तूची अपेक्षा नव्‍हती. “माया व मोक्ष माझ्या चरणाजवळ आहे” असे ते म्‍हणत. औपचारिक शिक्षण किंवा तत्‍वज्ञानाच्‍या चर्चेशिवाय केवळ यांच्‍या आशीर्वादाने कित्‍येकांच्‍या आत्‍म्‍यांना मोक्ष मिळाला. सर्व भक्‍तांना आशीर्वाद देतांना ते फक्‍त तीनच शब्‍द म्‍हणत “अल्‍ला अच्‍छा करेगा” (परमेश्‍वरी कृपेने सर्व चांगले होईल).

शिरडीच्‍या एका वृध्‍देने त्‍यांचे वर्णन पुढील प्रमाणे केले.

हा सुंदर तरतरीत देखणा तरुण प्रथम निंब वृक्षाखाली आसन घालून बसलेला दिसला. थंडीची किंवा उन्‍हाची पर्वा न करता निंबवृक्षाखाली कठोर तपश्‍चर्या करणा-या या तरुणाला पाहून शिरडीच्‍या लोकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. दिवस-रात्र कोणीही त्‍याच्‍या संगतीत नसायचे, रात्री त्‍यांना कशाचीही भिती वाटत नव्‍हती. लोक नवल करायचे व एकमेकांना म्‍हणायचे “हा तरुण केव्‍हा आला ?” त्‍यांचे व्‍यक्तिमत्‍व एवढे विलोभनीय होते की केवळ त्‍यांचेकडे दृष्‍टीक्षेप टाकताच प्रसन्‍नता वाटे. ते कधीही कोणाच्‍या घरी गेले नाहीत. सतत निंबाखाली बसून राहत. वरवर पाहता जरी ते तरुण दिसत होते तरी त्‍यांच्‍या उक्‍तीने व कृतीने ते एक महान आत्‍मा भासत होते. ते शांततेची मूर्ती होते.

असे म्‍हणतात, एक दिवस खंडोबा देव एका भक्‍ताच्‍या अंगात आले. लोकांनी खंडोबाला विचारले “देवा कोणा पुण्‍यवान पित्‍याचा हा सुपुत्र आहे. आणि केव्‍हा येथे आला ?”

खंडोबा देवाने त्‍यांना कुदळी, खोरे (फावडे) आणावयास सांगितले आणि विशिष्‍ट ठिकाणी खोदावयास सांगितले. तेव्‍हा त्‍यांना पसरट दगडाखाली विटा दिसल्‍या. दगड व विटा बाजूला केल्‍यानंतर त्‍यांना तळघराकडे जाण्‍याचा रस्‍ता दिसला. तळघरात गोमुखी लाकडी पाट आणि जपमाळ दिसली.

खंडोबा म्‍हणाले “या तरुणाने येथे बारा वर्षे तप केले”. लोकांनी तरुणाला विचारले असता तो म्‍हणाला “हे माझ्या गुरुचे ठिकाण आहे”. आपल्‍या गुरुंचे वतन चांगले सांभाळण्‍याची त्‍यांनी लोकांना विनंती केली.

अशा प्रकारे तरुण साईबाबा तीन वर्षे शिरडीत राहिले. त्‍यानंतर अचानक अदृष्‍य होऊन ते निजामाच्‍या राज्‍यात औरंगाबाद जवळ प्रगट झाले. आणि साधारण वयाच्‍या २० व्‍या वर्षी धूप गावचा पाटील चांदभाई यांच्‍या घरच्‍या लग्‍नाच्‍या व-हाडाबरोबर शिरडीला आले.

शिरडीला पुनरागमन

औंरगाबाद जिल्‍ह्यात धुप या गावात चांदपाटील नावाचे मुसलमान सदगृहस्थ राहत होते. एकदा ते औंरंगाबादला जात असतांना त्‍यांची घोडी हरवली. दोन महिने त्‍यांनी घोडीचा कसून शोध घेतला तरीही काही तपास लागला नाही. निराश होऊन खांद्यावर घोडीचे खोगीर टाकून ते औंरंगाबारहून परत निघाले. साडेचार कोस चालून आल्‍यावर त्‍यांना एका आंब्‍याच्‍या झाडाखाली एक फकीर बसलेला दिसला. त्‍या फकीराच्‍या डोक्‍यावर टोपी तर अंगावर कफनी घतेलेली होती, बगलेत सोटा (सटका) होता असा हा फकीर चिलीम पिण्‍याची तयारी करीत होता. चांद पाटलाला पाहून फकीराने त्‍याला चिलीम पिण्‍यास आाणि थोडा वेळ विश्रांती घेण्‍यास बोलावले. फकीराने त्‍याला खोगीराविषयी विचारले असता चांदपाटील म्‍हणाले की ते त्‍यांच्‍या हरवलेल्‍या घोडीचे खोगीर आहे. त्‍या फकीराने चांदपाटलांना जतळच्‍या ओढ्यातच घोडी शोधण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे केले असता, काय आश्‍चर्य ! घोडी सापडली. चांदपाटलांना असे वाटले हा फकीर सामान्‍य नसून मोठा संत किंवा महात्‍मा आहे. चांदपाटील घोडी घेवून फकीराकडे आला. ओढण्‍यासाठी चिलीम तयार होती. फक्‍त दोन गोष्‍टी आवश्‍यक होत्‍या चिलीम पेटविण्‍यासाठी विस्‍तव व छापी ओली करण्‍यासाठी पाणी. फकीराने आपला चिमटा जमीनीवर आपटला असता जळता निखारा बाहेर आला. तो पेटलेला निखारा फकीराने चिलीमीवर ठेतला. नंतर त्‍याने सटका जमीनीवर मारला. तेथून पाण्‍याचा फवारा वर आला. हे सर्व पाहून चांदपाटलांना फार आश्‍चर्य वाटले. फकीराने छापी भिजवून चिलमीला गुंडाळली. आपण स्‍वत: चिलीम ओढून नंतर चांदपाटलाला दिली. त्‍यांनी फकीराला आपल्‍या घरी येण्‍याची विनंती केली. दुस-या दिवशी ते चांदपाटलाच्या घरी गेले व काही वेळ थांबले. पाटील धुप गावचा ग्रामअधिकारी होता. त्‍याच्‍या मेव्‍हण्‍याच्‍या मुलाचे लग्न शिरडी येथे होते. पाटील शिरडीला लग्‍नाला जाण्‍याच्‍या तायारीत होते. त्‍यांनी या फकीरालाही लग्‍नाला येण्‍याची विनंती केली. त्‍याप्रमाणे फकीर लग्‍नाच्‍या व-हाडाबरोबर शिरडीस आले. लग्‍न सुखरुप पार पडले. वरात धुप गावात परत गेली. फकीर शिरडीतच राहिले ते कायमचे.

फकीराला “ साई” नाव प्राप्‍त झाले

धूप गावचे हे व-हाड सडकेवरच असलेल्‍या शिरडीच्‍या खंडोबा मंदिराच्‍या आवारातील वडाच्‍या झाडाखाली थांबले. मोकळ्या पटांगणात गाड्या सोडल्‍या जावून एकेक जण गाडीतून खाली उतरला. फकीराला खाली उतरतांना खंडोबाचे पुजारी म्‍हाळसापती यांनी त्‍याला पाहीले आणि अंत:स्‍फूर्तिने “या साई” (आओ साई) म्‍हणून स्‍वागत केले. पूढे हेच नाव सर्वतोमुखी होऊन ते ‘साईबाबा’ या नावाने ओळखले जावू लागले.

परत शिरडीला आल्‍यावर ते सलग साठ वर्षे म्‍हणजे त्‍यांच्‍या महानिर्वाणापर्यत शिरडीतच राहिले. त्‍यांचे महानिर्वाण मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर १९१८ या दिवशी झाले.

सुरुवातीला बाबा शिरडीच्‍या शिवेवर रहात असत. नंतर चार ते पाच वर्षे वे ज्‍याला आज गुरुस्‍थान म्‍हणतात त्‍या निंबवृक्षाखाली राहीले. पूढे ते दूर्लक्षीत अशा मशिदीत राहवयास गेले. त्‍या मशिदीलाच आज “व्‍दारकामाई” म्‍हणतात.

हळूहळू त्‍यांची महती लोकांच्‍या लक्षात आली. त्‍यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्‍यांच्‍या अवतार कार्याच्‍या उत्‍तरार्धात त्‍यांनी हजारो लोकांना शिरडीकडे आकर्षित केले. त्‍यांच्‍या आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या दशकात सर्व पुजासाहित्‍यानिशी समारंभपूर्वक त्‍यांची पूजा सुरु झाली. आणि व्‍दारकामाईला राजदर‍बाराचे स्‍वरुप प्राप्‍त झाले. तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली बदलली नाही.

बाबांचे कार्य व उपदेश

Mission and Advice१७ व्‍या शतकात (सन १६०८ ते १६८१) समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देऊन त्‍यांच्‍या हातून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थपना करवून घेतली व निराधार, दु‍बळ्या जनांचे जुलमी मोगल सत्‍तेपासून संरक्षण करण्‍याचे अंगिकृत कार्य फार मोठ्या प्रमाणात पार पाडले. परंतु दोन शतकानंतर पुन्‍हा, हिंदू –मुसलमान समाजातील दरी (अंतर) रुंदावत गेली व त्‍या दोन्‍ही समाजामध्‍ये दुवा-एकोपा साधण्‍यासाठीच श्री साईबाबांचा अवतार झाला अशी भाविकांची श्रध्‍दा आहे.

बाबा सदैव हिंदू-मुस्‍लीम एकोप्‍यासाठी सर्वांना उपदेश करीत. सर्व आत्‍म्याचा प्रभु सर्वश्रेष्‍ठ परमेश्‍वर एकच आहे. परमेश्‍वराजवळ सर्वजण सारखेच आहेत आणि तो कोणावरही कृपा करतांना भेदभाव करीत नाही. कोणच्‍याही सदगुण दुर्गूणांचा विचार न करता परमेश्‍वर प्रत्‍येकावर कृपा करतो. हिंदूचा राम आणि मुसलमानांचा रहीम दोन्‍ही एकच असून त्‍यांच्‍यात जराही भेद नाही. मग त्‍यांच्‍या भक्‍तांनी आपआपसात कशासाठी भांडायचे ? तुम्‍ही निष्‍पाप जनतेने, मुलाबाळांनी हातात हात घेऊन दोन्‍ही समाज एकत्र आणावे. सुज्ञपणाने वागून राष्‍ट्रीय ऐक्‍याचे उद्दिष्‍ट साध्‍य करावे. आपआपसात भांडणे किंवा वाद घालणे योग्य नाही. म्‍हणून वाद घालू नये. कोणाचाही अवमान करु नये. परमेश्‍वर तुमचे रक्षण करीन. योग, त्‍याग, तपश्‍चर्या आणि ज्ञानमार्ग हे ईश्‍वरप्राप्‍तीचे मार्ग आहेत. तुम्‍ही जर यापैकी कोणत्‍याच मार्गाचा अवलंब केला नाही तर तुमचा जन्‍म व्‍यर्थ आहे. जर कोणी तुमच्‍यावर अन्‍याय केला तर त्‍याचा प्रतिकार करु नका. जर तुम्‍ही काही करु शकत असाल तर फक्‍त दुस-याचे भले (कल्‍याण) करा. मी सदैव सत्‍य विचार व कृती याचा आधार देईल.

सर्वांना बाबांचा थोडक्‍यात हा असा उपदेश होता. हा उपदेश व्‍यक्‍तीच्‍या ऐहिक अधिक अध्‍यात्मिक बाबतीत चांगला आधार देईल बाबांनी आपल्‍या भक्‍तात कोणताही भेद न करता सर्वाना त्‍यांच्‍या ऐहिक प्रगतीसाठी आणि आत्मिक उन्‍नतीसाठी आपल्‍या सदैव यशस्‍वी होणा-या दैवी आशीर्वादाचे आश्‍वासन दिले आहे. “आपल्‍या आयुष्‍यात संकट समयी बाबांचे संरक्षण आणि त्‍वरीत आधार मिळाला नाही”, असा दु:खद अनुभव असलेला जगात कोणीही नाही.

घेई वेड पिसे, मशीदित वसे, लीन स्‍वरुपी असे भिक्षा मागतसे, कथा कथितसे, ज्ञानोपदेशीतसे । भक्‍ता रक्षितसे, जमी फिरतसे, रुपे बहु घेतसे ऐशा प्रेमरसे, नमू मधुरसे त्‍या साईप्रत सारसे । । (कै. बाळकृष्‍ण देवांच्‍या कीर्वनावरून )

बाबा म्‍हणजे सदगुरु –

हातात संबळ आणि एकतारी घेऊन दारोदार जाणारे आणि आध्‍यात्‍माचा देखावा करणारे तथाकथीत गुरु पुष्‍कळ आहेत. ते मंत्राने आपल्‍या शिष्‍याचे कान फुंकतात व पैसे कमवितात. ते त्‍यांच्‍या पंथाचे धार्मिक तत्‍वज्ञान शिकवितात पण ते स्‍वत: मात्र अपवित्र आणि अधार्मिक असतात.

श्री साईंनी अशा प्रकारे आपल्‍या धार्मिकतेचे प्रदर्शन कधीच केले नाही. त्‍यांना आपल्‍या देहाची अजिबात पर्वा नव्‍हती. त्‍यांचे आपल्‍या शिष्‍यावर खुप प्रेम होते. जगात दोन प्रकारचे गुरु असतात. १ नियत (विशिष्‍ट ) २ अनियत (सर्वसामान्‍य) – विशिष्‍ट गुरु-शिष्‍य नाते नसलेले गुरु उपदेश करुन आपल्‍यात सदगुण निर्माण करतात. आपले अंत:करण शुध्‍द करुन आपल्‍याला मोक्षाच्‍या मार्गाला लावतात. नियत गुरुशी संपर्क आल्‍यावर आपणास दोघांतील भेद कळेनासा होतो आणि “तू तोच आहेस” असे जाणून एकरुप होतो. जगात व्‍यवहारी ज्ञान देणारे अनेक गुरु आहेत. पण जो आपणास स्‍वत:च्‍या ठायी एकरुप करुन संसार सागर तारुन नेतो तोच एक सदगुरु होय. साईबाबा सदगुरु होते. व नेहमी म्‍हणायचे “शब्‍दाने माया निर्माण होते. पण सदगुरुंच्‍या संतसंगतीमुळे ज्ञान प्राप्‍त होऊन अज्ञान नाहीसे होते” त्‍यांचे मोठेपण शब्‍दातीत आहे. जो कोणी बाबांचे दर्शनाला जात असे त्‍याला बाबा न विचारता त्‍याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्‍यातील बारीक सारीक तपशील सांगत असत. त्‍यांना सर्व सजीवांत परमेश्‍वर दिसत असे. शत्रु आणि मित्र, दुर्गुणी आणि सदगुणी त्‍यांना समान होते. मानसिक संयमाने आणि निरासक्‍त भावनेने अपराध्‍यावरही ते कृपा करीत. विषमप्रसंगी अणि उत्‍कर्षात ते समान वागत. संशय कधी त्‍यांच्‍या मनाला शिवला नाही. जरी त्‍यांनी मानवी देह धारण केला होता तरी त्‍यांना देहाविषयी किंवा घराविषयी मोह नव्‍हता. जरी ते देहधारी होते तरी ते मुक्‍तात्‍मा होते. तथापि कधी विचारले तर स्‍वत:चे गुरु म्‍हणून ते वेंकुशा यांचा उल्‍लेख करीत.

यशवंत आणि श्रीमंत । वैराग्यशाली ज्ञानवंत । ऐश्‍वर्य औदार्यपंडित । षड् गुणान्वित मूर्ति हे । (स.अ.१०, ओवी ८५)

 

Wonderful Incarnation

Wonderful IncarnationSai Baba as a Yogi- Satchidanand SATGURU

Sai Baba knew all yogic practices. He was well versed in the six processes including Dhauti, Khandayoga and Samadhi, etc. He demonstrated His mastery over yogic exercises many a time.

Yet, if you think that he was a Hindu, He looked like a Yavan. If you think Him to be a Yavan, he looked like a pious Hindu. No one definitely knew whether he was a Hindu or a Mohammedan. Inferences could be drawn from His dress or body features but all such superficial inferences were meaningless. They did not serve any purpose.

He celebrated the Hindu festival of Rama-Navami with all due formalities and at the same time permitted the ‘Sandal’ procession of the Mohammedans. He encouraged wrestling bouts in this festival and gave good prizes to winners. When the Gokul Ashtami came, he got the ‘Gopal-Kala’ ceremony duly performed and on Id festivals, he allowed Mohammedans to say their prayers (Namaj) in his masjid.

Once in the Moharum festival, some Mohammedans proposed to construct a Tajiya or Tabut in the Masjid, keep it there for some days and afterwards take it in the procession through the village. Sai Baba allowed the keeping of the Tabut for four days and on the fifth day removed it out of the Masjid without the least compunction. He allowed all the devotees to celebrate festivals at Shirdi according to their preferences and the various religious in vogue adopted by them. In Baba's Masjid except a garlanded wall there is no image or photograph of any deity.

If we say that he was a Mohammedan, his ears were pierced (i.e. had holes according to Hindu fashion). If you think that he was a Hindu, he advocated the practice of circumcision (though according to Mr Nanasaheb Chandorkar, who observed him closely, he was not himself circumcised. Wide article in Sai Leela on "Baba Hindu Ki Yavan" by B.V. Deo, page 562). If you call him Hindu, he always lived in the Masjid; if Mohammedan, he had always the Dhuni - sacred fire there, and the following things which are contrary to Mohammedan religion, i.e., grinding on the hand mill, blowing of the conch and bells, oblation in the fire, Bhajan, giving of food, and worship of Baba’s Feet by means of ARDHYA (water) were always allowed there. If you think that he was a Mohammedan, the best of Brahmins and Agnihotris, leaving aside their orthodox ways, fell prostrate at his feet. Those who went to make enquiries about his nationality were dumb-founded and were captured by his Darshana. He gave visions of all the respective Gurus and deities according to devotees choice whether expressed or hidden. Baba, when asked about his creed, to that he belonged to Saint Kabir's creed.

So none could definitely decide whether Sai Baba was a Hindu or a Mohammedan. This is no wonder; for he who completely surrenders himself to the Lord, by getting rid of his egoism and body - consciousness thus becomes one with him, and has nothing to do with any questions of caste or nationality. Such a one as Sai Baba was, saw no difference between caste and among beings and beings. He took meat and fish with Fakirs, but did not grumble when dogs touched the dishes with their mouths. Thus Sai Maharaj was beyond all personal references, time and space dimensions.

Such a unique and wonderful GOD incarnation was Sai Baba.

[* Note--(1) Mhalsapati, an intimate Shirdi devotee of Baba, who always slept with Him in the Masjid and Chavadi, said that Sai Baba told him that he was a Brahmin of Pathari and was handed over to a Fakir in his infancy, and when He told this, some men from Pathari had come, and Baba was enquiring about some men from that place. [Vide Sai Leela 1924, Page 179. (2) Mrs. Kashibai Kanitkar, the famous learned woman of Poona says in the experience No.8, published on Page 79, Sai Leela Vol. 11,1934, - "On hearing of Baba’s miracles, we were discussing according to our theosophical convention and fashion whether Sai Baba belonged to black or white lodge. When once I went to Shirdi, I was thinking seriously about this in my mind. As soon as I approached the steps of the Masjid, Baba came to the front and pointing to His chest and staring at me spoke rather vehemently -"This is a Brahmin, pure Brahmin. He has nothing to do with black things. No Musalman can dare to step in here. He dare not." Again pointing to his chest - "This Brahmin can bring lacks of men on the white path and take them to their destination. This is a Brahmin’s Masjid and I won’t allow any black Mohammedan to cast his shadow here."]

Sai Baba is widely regarded as an incarnation of God, but he always said that he was an obedient servant of God. Though an incarnation he showed the people the way how to behave satisfactorily and carry out the duties of their respective stations (Varnas) in this life. He never emulated others in any way, nor asked others to have something done for him. For him, Who saw the Lord in all movable and immovable things of this world, humility was the most proper thing. None he disregarded or disrespected; for he saw Narayan (Lord) in all beings, he never said, "I am God," but that he was a humble servant and he always remembered him and always uttered - "Allah Malik" (God is the sole proprietor or Owner). By his thoughts and worldly behavior He established ideal values and virtues of faith, patience and humanity. One should concentrate on and do faithfully one's duties assigned to him/her by GOD and wait patiently for the results (fruits) of his action (Karma) because the effect of any cause is always determined by GOD.

उदीचे माहत्‍म्‍य आणि अलौकिक सामर्थ्‍य

UDIबाबा सर्वाकडून दक्षिणा मागून घेत हे सर्वज्ञात आहे. दक्षिणेच्‍या रकमेतून बाबा धर्मादाय खर्च मोठ्या प्रमाणात करीत असत आणि उरलेल्‍या पैशातून धुनिला सरपण–जळण खरेदी करीत असत. हे सरपण ते सतत प्रज्‍वलीत ठेवलेल्‍या धुनित टाकीत. या धुनितील राखेला उदी म्‍हणतात. साईभक्‍त शिरडीहून परत जात असतांना बाबा त्‍याला ही उदी विना मोबदला देत असत. उदी म्‍हणजे कर्तूम-अकर्तूम शक्‍ती असलेली धरणीवरील पवित्र वस्‍तू होय. अग्नित केलेल्‍या त्‍यागाचे ते फळ आहे. अग्नि वाईटाचा नाश करुन सर्वाना निर्दोष-पवित्र करतो. यज्ञ करणे हा सर्वात महत्‍वाचा धर्मिक विधी आहे. असे प्राचीन वैदिक वाड्:मयात नमूद केले आहे.

बाबांच्‍या उदी देण्‍यात खुप गहन महत्त्व व रहस्‍य दडलेले होते. विश्‍वातील सर्व दृश्‍य वस्‍तू नाशवंत आहेत असे बाबा उदीच्‍या माध्‍यमातून शिकवित असत. पंचमहाभूतांनी (पृथ्‍वी, आप, तेज, वायू, आकाश) बनलेला आपला देह एक दिवस निर्जीव होऊन पडेल. त्‍याचे सर्व उपभोग संपलेले असतील. आणि या देहाची राख होईल. भक्‍तांना याची आठवण देण्‍यासाठी बाबा उदी देत. उदीच्‍या माध्‍यमातून बाबा असेही शिकवित की, केवळ ब्रम्‍ह सत्‍य आहे आणि जग मिथ्‍या असून कोणीही कोणाचा भाऊ, बाप, मुलगा, पती किंवा पत्नी नाही. आपण जगात एकटे येतो आणि एकटे जातो. उदीने कित्‍येक मानसिक आणि शारीरीक रोग बरे झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. आणि आजही तसा अनुभव अनुभव येतो. बाबांना सत्‍य आणि असत्‍य, (भ्रामक) (भ्रामकाबद्दल निरासक्‍ती आणि सत्‍याबद्दल आसक्‍ती) हा फरक उदी आणि दक्षिणाच्‍या माध्‍यमातून भक्‍तांना पटवून द्यावयाचा होता. उदी शाश्‍वत-अशाश्‍वताचा भेद दाखविते तर दक्षिणा निरासक्‍ती शिकविते. हे दोन्‍ही गुण असल्‍याशिवाय आपणास ऐहिक अस्तित्‍वाचा महासागर तरुन जाता येणार नाही. म्‍हणून बाबा दक्षिणा मागत व घेत भक्‍त जाते वेळी त्‍याला उदी देत, काही उदी त्‍याचे कपाळाला लावीत आणि आपला वरदहस्‍त त्‍याच्‍या डोक्‍यावर ठेवीत असत. बाबा प्रसन्‍न मनस्थितीत असतांना आनंदाने गाणे गात. त्‍यातले एक गाणे उदी संबंधी होते. त्‍यातील एक ओळ अशी होती

रमते राम आयोजी | उदियाकी गोनिया लावोजी ||धृ || बाबा हे गाणे अत्‍यंत मधुर आवाजात म्‍हणत असत.

हे झाले उदीचे अध्‍यात्मिक महत्त्व. उदीला भौतिक महत्त्व सुध्‍दा आहे. उदीमुळे आरोग्‍य, भरभराट आणि चिंतामुक्‍ती मिळते. आणि इतरही व्‍यवहारी लाभ होतात. म्‍हणजेच उदीने आपले भौतिक आणि अध्‍यात्मिक ध्‍येय साध्‍य होते.

उदीलेपन उदीसेवन । हेच औषध हेच अनुपान । जाहले समूळ रोग निरसन । उगवला जो दिन दहावा । । (स.अ.३४, ओवी ८७)

बाबांचा स्‍वभाव आणि व्‍यक्तिमत्‍व -

Personalityश्री साईबाबांमुळेच शिरडीचे महत्त्‍व वाढले आहे. श्री साईबाबांचे स्‍वरुप जाणून घेणे मोठे मनोरंजक तसेच बोधप्रद आहे.

तरुन जाण्‍यास अत्‍यंत कठीण व अवघड अशा खोल सागराप्रमाणे असलेल्‍या संसाररुपी भवसागरावर बाबांनी विजय मिळविला होता. मन:शांती हा त्‍यांचा अलंकार होता. ते शहाणपणाचे व ज्ञानाचे भांडार होते. ते शैव व वैष्‍णवांचे माहेरघर होते. फकीर असले तरी ते उदारात उदार होते. आवश्‍यक गुणांचे ते सार होते. नाशवंत गोष्‍टीबद्दल त्‍यांना ना कधी प्रेम वाटले ना नश्‍वर गोष्‍टीत कधी सुख ! त्‍यांचे अंत:करण आरशासारखे स्‍वच्‍छ होते. त्‍यांच्‍या भाषणातून-बोलण्‍यातून सदैव अमृत वर्षाव होत असे. त्‍यांना राव आणि रंक दोघेही समान होते. ते मान अपमान जाणत नव्‍हते किंवा कोणाची पर्वाही करत नव्‍हते.

बाबा सजीवांचे परमेश्‍वर होते. ते मोकळेपणाने सर्वाशी बोलत. सर्वांमध्‍ये मिसळत. ते कधी नर्तकीचा नाच पाहत तर कधी लावण्‍या ऐकत. तरीही आपल्‍या समाधी अवस्‍थेपासून ते तिळमात्र विचलीत होत नसत. अल्‍लाचे नाव सतत त्‍यांचे जीभेवर असे. जेव्‍हा जग जागे असे तेव्‍हा ते झोपत आणि जेव्‍हा जग झोपायचे तेव्‍हा वे सतर्क असत. त्‍यांचे अंतरंग खोल सागरासारखे शांत असे. त्‍यांच्‍या वयाविषयी आणि चमत्‍काराविषयी निश्चित काही सांगता येत नाही. पण ते एके ठिकाणी असले तरी त्‍यांना सगळीकडचे ज्ञान असे. त्‍यांचा दरबार मनात भरणारा असे. ते रोज कित्‍येक गोष्‍टी सांगत, तरी आपल्‍या शांततेच्‍या शपथेपासून इंचभर हलत नसत. ते मशिदीत भिंतीला टेकून बसत आणि सकाळ, दुपार, संध्‍याकाळी लेंडीबागेत व चावडीकडे फिरावयास जात. प्रत्‍येक वेळी स्‍वत:त मग्न असत. ते स्‍वत: सिध्‍द असून साधकाप्रमाणे वागत. ते नम्र, साधे, अहंपणारहीत होते. साईबाबा आणि त्‍यांच्‍या चरणस्‍पर्शाने शिर्डी गावाला विशेष महत्‍व प्राप्‍त झालेले आहे.

बाबांना प्रश्‍न विचारल्यावर बाबा उत्‍तर देत. दिवसभर ते निंबाखाली बसत. कधी कधी शिर्डीच्‍या शिवावर ओढ्याकाठी बाभळीच्‍या सावलीत बसत.

मोक्षाच्‍या अपेक्षेने अनेक संन्‍यासी, साधू आणि इतर बाबांकडे येत असत. बाबा त्‍यांच्‍याशी हसून खेळून फक्‍त म्‍हणायचे “अल्‍ला मालिक”. त्‍यांना संभाषण किंवा युक्तिवाद आवडत नसे. व वादाला ते प्रोत्‍साहनही देत नसत. ते नेहमी शांत व संयमी असत. कधी कधी रुद्रावतार धारण करत असत. आपल्‍या अवतार कार्यात साईनाथांनी पांडीत्‍यपूर्ण कीर्तन अगर प्रवचन कधीही केले नाही. मात्र वेदांतातल्‍या अनेक गूढ सिध्‍दांतांचे सोप्‍या भाषेत स्‍पष्‍टीकरण करुन त्‍यांनी अनेक पंडीतांनाही थक्‍क केले. खरे साई शेवटपर्यत कोणालही कळले नाही.

पोशाख, वागणे आणि दिनचर्या

त्‍यांचे वागणे शांत आणि सौम्‍य होते. कधी कधी ते संतापायचे चिडायचे परंतु त्‍यामागे कोसळणा-या नैसर्गिक आपत्‍तीची किंवा भक्‍तावर येणा-या संकटाची पूर्वसूचना देणे हा उद्देश असायचा. ते फार बोलत नसत. त्‍यांचे डोळे आकाशाचे निरीक्षण करायचे. सुरुवातीचा काही काळ बाबा आपल्‍या डोक्‍यावरचे केस राखत असत. ते डोक्‍याला फडके बांधायचे व त्‍या फडक्‍याची डाव्‍या कानाच्‍या पाठीमागे गाठ बांधत असत. कित्‍येक आठवडे धुतल्‍याशिवाय ते फडके बाबा वापरीत असत. तर अंगात मांजरपाटाची कफनी असायची. ते पादत्राणे वापरत नसत. अनेक वर्षे तरटाचा तुकडा हेच त्‍यांचे आसन होते. ते कौपीन वापरत असत. थंडीपासून बचाव करण्‍यासाठी ते आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करुन धुनीजवळ बसत. बाबा झोपतांना वीटेवर डोके ठेवून झोपत.

बाबा रोज गावात ठराविक ठिकाणी जात. दारोदारी जावून याचकाप्रमाणे उभे राहत व “भाकरी वाढा ओ माई” म्‍हणत आणि भिक्षा घेण्‍यासाठी हात पुढे करीत. एका हातात टमरेल व दुस-या हातात चौपदरी झोळी असे. पातळ भाजी, आमटी, दुध, ताक इ ते टमरेलामध्‍ये घेत आणि भात, भाकरी आणि इतर घट्ट पदार्थ झोळीत घेत. बाबांनी जीभेवर विजय मिळविला होता. आणि त्‍यांच्‍या जीभेला चव माहीत नव्‍हती. झोळीमध्‍ये आणलेली भिक्षा ते कोळंब्‍यात एकत्र करीत. पशु पक्षी ते खाण्‍यासाठी काळंब्‍याभोवती गर्दी करीत. बाबांनी त्‍यांना खाण्‍यास कधीही मना केले नाही.

बाबा दुपारपर्यत भिक्षा मागत पण अत्‍यंत अनियमितपणे ! कधी त्‍यांची फेरी लवकर संपे, तर कधी दुपारी बारा वाजेपर्यत ते भिक्षा मागत.

दुपारी ते मनमोकळेपणाने फिरत. कधी शेजारच्‍या खेडयात जाऊन भक्‍तांना भेटत.

बाबांची शिकविण्‍याची पध्‍दत

बाबांच्‍या शिकवण्‍याच्‍या पध्‍दतीचा विचार करता त्‍यांनी कधीही प्रवचन दिले नाही किंवा औपचारिक शिकवण दिली नाही. त्‍यांनी तत्‍वज्ञानाचे कोणतेही पुस्‍तक लिहीले नाही. प्रत्‍यक्ष अनुभव आणि स्‍वत:च्‍या जीवनातील उदाहरणे देऊन ते दृष्‍टांत सांगत असत. भक्‍तांना त्‍यांचे ईश्‍वरी प्रेम आणि वरदान प्रत्‍यक्ष प्राप्‍त होत असे. त्‍यासाठी मध्‍यस्‍थाची आवश्‍यकता नसे. व्‍यवहारी अपेक्षा पूर्ण झाल्‍याचा प्रत्‍येकाला अनुभव येई. तसेच आत्‍मबोधाचेही समाधान लाभे. या अनुभवाला कोणीही अपवाद नाही.

बाबा आपल्‍या भक्‍तांच्‍या अपेक्षा प्रत्‍यक्ष पूर्ण करीत. त्‍यासाठी भक्‍तांना धार्मिक कृत्‍य करावी लागत नसत.

बाबा भक्‍तांना आपला ईश्‍वर आाराधनेचा मार्ग बदलू देत नसत. तोच मार्ग अनुसरण्‍यास सांगत. त्‍यांनी व्‍यवहारी जीवनाचा पूर्ण त्‍याग करण्‍यास कधीही सांगितले नाही. तसेच आपण निवडलेल्‍या किंवा परंपरागत असलेल्‍या दैवतात बाबा बदल करु देत नसत. परमेश्‍वराच्‍या अंतिम सामर्थ्‍यावर (अल्‍ला मालिक) विश्‍वास व निष्‍ठा ठेवण्‍यास त्‍यांनी सांगितले. तसेच कर्माचे फल प्राप्‍त करुन घेण्‍यासाठी सबुरी ठेवण्‍यास सांगितले.

बाबांच्‍या कृपेने भक्‍तांना अनुभव येतो. त्‍यामुळे व बाबांप्रती भक्‍तांची निष्‍ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्‍या भक्‍ताच्‍या सर्व व्‍यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्‍या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्‍या हाताने परत जात नाही.

बाबांनी हाताळलेल्‍या वस्‍तू / उपकरणे

Chulli

चूल

या चुलीवर बाबा अन्‍नप्रसाद शिजवित आणि व्दारकामाईत जमलेल्‍या भक्‍तांना वाटीत असत.

Kolamba

कोळंबे

व्‍दारकामाईत ठेवलेल्‍या या कोळंब्‍यात जमा झालेले भिक्षान्‍न बाबा एकत्र करीत. या उघड्यावर ठेवलेल्‍या कोळंब्‍यातील भिक्षान्‍न पशु–पक्षी, कुत्रे, मांजरी, डुकरे, कीडे प्रथम खात असत. उरलेले अन्‍न बाबा स्‍वत: खात.

Water-Pot

पाण्‍याचे भांडे

तहानलेल्‍यांना पिण्‍यासाठी बाबा या भांड्यात पाणी भरुन ठेतीत असत.

Jata

दगडी जाते व गव्‍हाचे पोते

या जात्‍याचा उपयोग बाबा गहू दळण्‍यासाठी करीत असत. गव्‍हाचे पीठ करणे म्‍हणजे “कर्मरुपी धान्‍याचे पीठात रुपांतर करुन केलेल्‍या ब-या – वाईट कर्माचे परिणाम टाळून जीवात्‍म्याला कर्म बंधनातून मुक्‍त करणे होय ”.

Udi Stand and Kathada

उदी स्‍टॅन्‍ड व कठडा

मशिदीत बाबा याच कठड्यावर हात ठेवून बसत आणि येणा-या भक्‍तांवर कृपादृष्‍टी करत असत व त्‍यांना प्रसाद म्‍हणून विश्‍वातील मौल्‍यवान, पवित्र अशी उदी व प्रसाद देत.

Baba’s Bathing Stone

बाबांचा अंघोळीचा दगड

एका साईभक्‍ताने तयार करुन दिलेल्‍या या दगडावर (दगडी चौरंगावर) बाबा स्‍नान करीत असत.

Udi Stone and Ota

उदीचा दगड ओटा

बाबा या ओट्यावर बसत. याच ओट्यावर उदी स्‍टॅन्‍ड ठेवलेला आहे. या उदीच्‍या दगडी स्‍टॅन्‍डवर उदबत्‍ती, उद जाळून पवित्र सुगंधी वातावरण निर्माण करीत.

Satka

सटका

आपल्‍या भक्‍तांचे संरक्षण करण्‍यासाठी वाईट गोष्‍टींना दुष्‍कृत्‍यांना दूर हाकलण्‍यासाठी बाबा या सटक्‍याचा उपयोग करीत असत.

Two Copper Pots

तांब्‍याच्‍या दोन हंड्या

प्रसाद म्‍हणून गोडभात किंवा खिचडी शिजवण्‍यासाठी बाबा या हंड्याचा उपयोग करीत असत.

Note: Drag to scroll