श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी देत असतात. कर्नाटक येथील रहिवाशी साईभक्त व्यंकप्पा गणपती घोडके यांनी ०४ लाख ७६ हजार ३६४ रूपये किमतीचे ५६.७१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे श्री साईचरणी अर्पण करून संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांच्याकडे सुपुर्द केले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.