Languages

   Download App

News

News

आज दि. ०३ मे रोजी सोलापूर येथील दानशुर साईभक्‍त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्‍थानला चेक स्‍वरुपात रक्‍कम रुपये २० लाख व विविध प्रकाचे एकुण २०५.०५० ग्रॅम वजनाचे रक्‍कम रुपये १३ लाख २४ हजार १५८ रुपये किमतीचे सोन्‍याचे दागीने असे एकुण रक्‍कम रुपये ३३ लाख २४ हजार १५८ किमतीची देणगी दिली. त्‍याबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Recent News