Languages

   Download App

News

News

शिर्डी:-
    श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी,  नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या  संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दिनांक १३ ऑगस्‍ट, २०२६ ते गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट २०२६ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास येथील शताब्‍दी मंडपात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करणेत आले असून या सोहळ्या दरम्‍यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
    श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे.  या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. पारायण सोहळ्याचे हे ३२ वे वर्ष असून सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत (महिला वाचक) यांचे श्री साईसच्‍चरित पारायण वाचन होईल. 
    प्रथम दिवशी दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक काढणेत येईल, मिरवणूक पारायण मंडपात पोहचल्‍यानंतर तेथे ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत ब्राम्‍हण एकता मंच, शिर्डी यांचे विष्‍णु सहस्‍त्रनाम पठण कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी शाळेच्‍या विद्यार्थीनींचा सांस्‍कृतिक कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईबाबा इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल, शिर्डी (प्राथमिक विभाग) सांस्‍कृतिक कार्यक्रम, सायं. ०५.०० ते ०६.०० यावेळेत प्रा. श्री. सुनिल कांडेकर सर यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा व रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. कु. ओंकार महाराज बोचरे, निमगाव श्री ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर, निमगाव को-हाळे, यांचे किर्तन गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १४ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०१.०० ते ०२.०० यावेळेत श्री दिगंबर कुलकर्णी संस्‍थान पुजारी यांचे प्रवचन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. सायं.०५.०० ते ६.०० यावेळेत महिला पारायणार्थींसाठी हळदी कुंकू समारंभ व सायं. ६.०० ते रात्रौ ९.३० (धुप आरतीची वेळ सायं ०६.५५ ते ०७.३० वगळून) या वेळेत श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श बाल, प्राथमिक, माध्‍यमिक व आदर्श इंग्लिश मिडीयम स्‍कुल, शिर्डी शाळेचा सांस्‍कृतिक कार्यक्रम श्री साईआश्रम पारायण मंडप येथे होईल. तर, रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पाटील, नांदेड यांचा कीर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १५ ऑगस्‍ट रोजी सायं ०५.०० ते ०६.०० यावेळेत शाहिर श्री किशोर सासवडे मंदीर विभाग कर्मचारी यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा व रात्रौ. ०७.३० ते ०९.३०  यावेळेत ह.भ.प. श्री परमेश्‍वर महाराज शहापुरकर, नांदेड यांचा कीर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १६ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत साई स्‍वराधना ग्रुप, मालाड वेस्‍ट, श्री संदिप बा साबळे यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम तसेच सायं.०५.०० ते ०६.०० यावेळेत श्री अमित देशमुख, संस्‍थान पुजारी यांचा श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा तर रात्रौ.०७.३० ते रात्रौ.०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री. लहू महाराज कराळे, परभणी यांचे कीर्तन होईल. दि. १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११.३५ ते ११.४५ यावेळेत पुरुष वाचकांसाठी तर सायं. ०५.३५ ते ०५.४५ यावेळेत महिला वाचकांसाठी डॉ. श्राी नचिकेत वर्पे, शिर्डी यांचे रक्‍तक्षय (Anaemia), मधुमेह (Diabetes) व आहार - विहार विषयक व्‍याख्‍यान श्री साईआश्रम पारायण मंडप येथे होईल. दुपारी ०१.०० ते ०२.०० यावेळेत श्री गोरक्षनाथ नलगे, संस्‍थान प्र. विधी अधिकारी यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन कार्यक्रम, सायं.५.०० ते ६.०० यावेळेत सौ. आशाबाई भानुदास गोंदकर, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह. भ. प. कु. कृष्‍णा महाराज हजारे, यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. १८ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत प्रा. डॉ. सुनिता वडीतके, प्राध्‍यापिका सिनियर कॉलेज, शिर्डी यांचा प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत ह. भ. प. हर्षद महाराज खैरनार, सिन्‍नर जि. नाशिक यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. १९ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११.०० ते १२.०० यावेळेत पुरुष पारायणार्थीकरिता तर, सायं. ०५.०० ते ०६.०० यावेळेत महिला पारायणार्थीकरिता श्री साईसच्‍चरित्र पारायण परीक्षा पारायण मंडप येथे पार पडेल. दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत प्रा. डॉ. सोनाली हरदास, प्राध्‍यापिका, सिनिअर कॉलेज, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत ह.भ.प. सेवक साईदास महाराज हासे, श्री क्षेत्र इंदोरी यांचे प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. श्री रमेश महाराज क्षिरसागर, परभणी  यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
तर गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.०० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० वाजता महिला वाचक यांची अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. त्‍यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत दि. १९ ऑगस्‍ट रोजी घेण्‍यात आलेल्‍या श्री साईसच्‍चरित्र पारायण परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात येवून विजेत्‍यांना मान्‍यवारांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण करण्‍यात येईल. दुपारी ०२.०० वाजता गावातुन श्री साईसच्‍चरीत्र ग्रंथ (पोथी) मिरवणुक होईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर वीणा पूजन होईल. तर दुपारी ०२.००ते ०३.०० यावेळेत श्री वसंत वाणी सर श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम तर, रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. श्री रामनाथ महाराज शास्‍त्री यांचे किर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. 
दि. २१ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्‍हापुर यांचे गोपाळकाला कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर, सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्‍हापुर यांचे भारुड कार्यक्रम होईल.
पारायण मंडपात सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत पारायणाच्‍या वेळी फक्‍त पुरुषच पारायण करतील व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत फक्‍त महिलाच पारायण करतील. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी,  नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने करण्‍यात आले.  
    हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, नाटय रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Shirdi:

Jointly organized by Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi), Natya Rasik Manch (Shirdi), and Shirdi villagers, the 32nd Shri Saisatcharitra Parayan Ceremony will take place from Thursday, August 13, 2026, to Thursday, August 20, 2026, at the Shatabdi Mandap in Sai Ashram Bhakta Niwas. Various religious and cultural programs will be held during this period.

Daily Parayan & Rules

  • Male Readers: 07:00 AM to 11:30 AM

  • Female Readers: 01:00 PM to 05:30 PM

  • Important Guidelines: Readers must bring their own holy book (Granth), coconut (Shrifal), and seating mat (Baskar). School students and individuals under 18 years of age are not permitted.

Daily Schedule of Events

Date Time Event Details Venue
Aug 13 06:00 AM Procession of Pothi & Photo from Samadhi Temple to Parayan Mandap, followed by Granth & Kalash Pujan Temple to Mandap
  10:00 AM - 11:30 AM Vishnu Sahasranama Chanting by Brahmin Ekta Manch Shatabdi Mandap (Gate 3)
  01:00 PM - 03:00 PM Cultural program by students of Shri Saibaba Kanya Vidya Mandir Shatabdi Mandap (Gate 3)
  03:00 PM - 05:00 PM Cultural program by Shri Saibaba English Medium School (Primary Dept.) Shatabdi Mandap (Gate 3)
  05:00 PM - 06:00 PM Shri Sai Charitra Discourse (Pravachan) by Prof. Sunil Kandekar Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Omkar Maharaj Bochare (Nimgaon) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 14 01:00 PM - 02:00 PM Discourse (Pravachan) by Shri Digambar Kulkarni (Sansthan Priest) Shatabdi Mandap (Gate 3)
  05:00 PM - 06:00 PM Haldi Kumkum ceremony for female participants Sai Ashram Parayan Mandap
  06:00 PM - 09:30 PM Cultural program by Adarsh Schools (Excluding Dhoop Aarti 06:55–07:30 PM) Sai Ashram Parayan Mandap
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Sujatatai Patil (Nanded) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 15 05:00 PM - 06:00 PM Discourse (Pravachan) by Shahir Shri Kishor Saswade Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Parmeshwar Maharaj Shahapurkar (Nanded) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 16 03:00 PM - 05:00 PM Cultural program by Sai Swaradhana Group (Malad West, Sandip Sable) Shatabdi Mandap (Gate 3)
  05:00 PM - 06:00 PM Discourse (Pravachan) by Shri Amit Deshmukh (Sansthan Priest) Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Lahu Maharaj Karale (Parbhani) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 17 11:35 AM / 05:35 PM Health Lecture on Anemia, Diabetes & Diet by Dr. Nachiket Varpe Sai Ashram Parayan Mandap
  01:00 PM - 02:00 PM Discourse (Pravachan) by Shri Gorakhnath Nalge (Legal Officer) Shatabdi Mandap (Gate 3)
  05:00 PM - 06:00 PM Discourse (Pravachan) by Smt. Ashabai Bhanudas Gondkar Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Krishna Maharaj Hajare Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 18 02:00 PM - 03:00 PM Discourse (Pravachan) by Prof. Dr. Sunita Waditke Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Harshad Maharaj Khairnar (Sinnar) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 19 11:00 AM / 05:00 PM Shri Saisatcharitra Parayan Exam (Men: 11 AM, Women: 5 PM) Parayan Mandap
  02:00 PM - 03:00 PM Discourse (Pravachan) by Prof. Dr. Sonali Hardas Shatabdi Mandap (Gate 3)
  03:00 PM - 05:00 PM Discourse (Pravachan) by H.B.P. Sevak Saidas Maharaj Hase (Indori) Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Ramesh Maharaj Kshirsagar (Parbhani) Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 20 07:00 AM / 09:00 AM Reading of Chapter 53 (Avataranika) & Concluding of Parayan Parayan Mandap
  10:30 AM - 11:30 AM Announcement of Parayan Exam results & Prize Distribution Parayan Mandap
  02:00 PM Village Procession of Shri Saisatcharitra Pothi, followed by Veena Pujan Shirdi Village
  02:00 PM - 03:00 PM Discourse (Pravachan) by Shri Vasant Wani Shatabdi Mandap (Gate 3)
  07:30 PM - 09:30 PM Kirtan by H.B.P. Ramnath Maharaj Shastri Shatabdi Mandap (Gate 3)
Aug 21 10:00 AM - 12:00 PM Gopal Kala Kirtan by H.B.P. Radhikatai Kalekar (Kolhapur) Parayan Mandap
  12:30 PM - 04:00 PM Mahaprasad Distribution Parayan Mandap
  07:30 PM - 09:30 PM Bharud program by H.B.P. Radhikatai Kalekar (Kolhapur) Parayan Mandap

शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), नाट्य रसिक मंच (शिर्डी) और शिर्डी ग्रामीणों के संयुक्त तत्वावधान में गुरुवार, 13 अगस्त 2026 से गुरुवार, 20 अगस्त 2026 तक साईआश्रम भक्तनिवास स्थित शताब्दी मंडप में 32वें श्री साईसच्चरित पारायण समारोह का आयोजन किया गया है। इस दौरान विभिन्न धार्मिक एवं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे।

नित्य पारायण एवं नियम:

  • पुरुष वाचक: सुबह 07:00 बजे से 11:30 बजे तक

  • महिला वाचक: दोपहर 01:00 बजे से 05:30 बजे तक

  • विशेष नियम: पाठकों को ग्रंथ, नारियल (श्रीफल) और आसन (बस्कर) स्वयं लाना होगा। स्कूली बच्चों और 18 वर्ष से कम आयु के पाठकों को प्रवेश की अनुमति नहीं होगी।

दैनिक कार्यक्रम तालिका

दिनांक समय कार्यक्रम का विवरण स्थान
13 अगस्त सुबह 06:00 बजे समाधि मंदिर से पारायण मंडप तक पोथी व फोटो की शोभायात्रा, तत्पश्चात ग्रंथ एवं कलश पूजन मंदिर से मंडप
  सुबह 10:00 - 11:30 ब्राह्मण एकता मंच द्वारा विष्णु सहस्रनाम पाठ शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  दोपहर 01:00 - 03:00 श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर की छात्राओं द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  दोपहर 03:00 - 05:00 श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल (प्राथमिक विभाग) का सांस्कृतिक कार्यक्रम शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  शाम 05:00 - 06:00 प्रो. सुनील कांडेकर द्वारा श्री साई चरित्र ग्रंथ प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. ओंकार महाराज बोचरे (निमगांव) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
14 अगस्त दोपहर 01:00 - 02:00 श्री दिगंबर कुलकर्णी (संस्थान पुजारी) द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  शाम 05:00 - 06:00 महिला पारायणार्थियों के लिए हल्दी-कुमकुम समारोह साईआश्रम पारायण मंडप
  शाम 06:00 - रात 09:30 आदर्श स्कूल का सांस्कृतिक कार्यक्रम (धूप आरती 6:55-7:30 बजे को छोड़कर) साईआश्रम पारायण मंडप
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. सुजाताताई पाटिल (नांदेड़) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
15 अगस्त शाम 05:00 - 06:00 शाहिर किशोर सासवाड़े (मंदिर विभाग) द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. परमेश्वर महाराज शहापुरकर (नांदेड़) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
16 अगस्त दोपहर 03:00 - 05:00 साई स्वराधना ग्रुप (मालाड वेस्ट) द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  शाम 05:00 - 06:00 श्री अमित देशमुख (संस्थान पुजारी) द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. लहू महाराज कराळे (परभणी) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
17 अगस्त सुबह 11:35 / शाम 05:35 डॉ. नचिकेत वर्पे द्वारा एनीमिया, मधुमेह और आहार-विहार पर व्याख्यान साईआश्रम पारायण मंडप
  दोपहर 01:00 - 02:00 श्री गोरक्षनाथ नलगे (कानूनी अधिकारी) द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  शाम 05:00 - 06:00 श्रीमती आशाबाई भानुदास गोंदकर द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. कृष्णा महाराज हजारे द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
18 अगस्त दोपहर 02:00 - 03:00 प्रा. डॉ. सुनिता वडीतके द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. हर्षद महाराज खैरनार (सिन्नर) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
19 अगस्त सुबह 11:00 / शाम 05:00 श्री साईसच्चरित पारायण परीक्षा (पुरुष: सुबह 11 बजे, महिलाएँ: शाम 5 बजे) पारायण मंडप
  दोपहर 02:00 - 03:00 प्रा. डॉ. सोनाली हरदास द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  दोपहर 03:00 - 05:00 ह.भ.प. सेवक साईदास महाराज हासे (इंदोरी) द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. रमेश महाराज क्षीरसागर (परभणी) द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
20 अगस्त सुबह 07:00 / 09:00 अध्याय 53 (अवतरणिका) का पठन एवं पारायण समापन पारायण मंडप
  सुबह 10:30 - 11:30 परीक्षा परिणाम की घोषणा एवं पुरस्कार वितरण पारायण मंडप
  दोपहर 02:00 बजे गांव में श्री साईसच्चरित ग्रंथ (पोथी) की शोभायात्रा एवं वीणा पूजन शिर्डी गांव
  दोपहर 02:00 - 03:00 श्री वसंत वाणी द्वारा प्रवचन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. रामनाथ महाराज शास्त्री द्वारा कीर्तन शताब्दी मंडप (गेट नं. 3)
21 अगस्त सुबह 10:00 - 12:00 ह.भ.प. राधिका कालेकर (कोल्हापुर) द्वारा गोपालकाला कीर्तन पारायण मंडप
  दोपहर 12:30 - 04:00 महाप्रसाद वितरण पारायण मंडप
  रात 07:30 - 09:30 ह.भ.प. राधिका कालेकर (कोल्हापुर) द्वारा भारुड़ कार्यक्रम पारायण मंडप

Recent News